गडचिरोली तेली समाज तळोधी मो. येथे संत संताजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण, समाजप्रबोधन व सत्कार सोहळा

तेली समाजाला न्याय मिळाला नाही. खा. रामदास तडस यांचे प्रतिपादन

    गडचिरोली - संपूर्ण भारतभर विखुरलेल्या तेली या जातीला व विदर्भात मोठ्या संख्येने असलेल्या ओबीसी व तेली जातीला जाणून - बुजून आरक्षणापासून डावलण्यात आले आहे. धुंदीसाठी पोकळ आश्वासनेच आपल्या समाजाला देऊन सर्वांची दिशाभूल केली आहे. एवढेच नाही, तर सर्वच क्षेत्रात अग्रेसर असलेल्या ओबीसी व तेली समाजाला स्वातंत्र्याच्या एवढ्या वर्षानंतरही न्याय मिळाली नाही, हेच आमचे सर्वात मोठे दुर्देव आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभेचे अध्यक्ष तथा खा. रामदास तडस यांनी केले.

    महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा जिल्हा शाखा गडचिरोली व संत जगनाडे महाराज तेली समाज संघटना तळोधी मो. यांच्याद्वारे आयेजित श्री संत जगनाडे महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण, समाज प्रबोधन व सत्कार सोहळ्याप्रसंगी ते उद्घाटक म्हणून बोलत होते.

    अध्यक्षस्थानी तेली समाज संघटनेचे प्रांतिक उपाध्यक्ष बबनराव फंड होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून तेली समाज महासंघाचे संस्थापक सदस्य विलास काळे, सत्कारमुर्ती म्हणून जिल्हा परिषद अध्यक्षा योगितताई भांडेकर, गडचिरोली नगर परिषदेच्या नगराध्यक्ष योगिताताई पिपरे, पंचायत समिती सभापती आनंद भांडेंकर, जि. प. सदस्य रमेश बारसागडे, नामदेव सोनटक्के, गडचिरोली न. प. चे उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, चामोर्शी न. पं. चे उपाध्यक्ष राहूल नैताम, पं. स. सदस्य उषाताई सातपुते, सुभाष वासेकर, विसापूरच्या सरपंच जयश्री दुधबळे, भाडभिडीच्या सरपंच भारती किरमे, तळोबीच्या सरपंच माधुरी सुरजगडे तर विशेष अतिथी म्हणून प्रांतिक तेली महासंघाचे विदर्भ उपाध्यक्ष बाबुराव कोळळे, जिल्हसध्यक्ष प्रभाकर वासेकर, प्रमोद पिपरे, रमेश भुरसे, राजेश्वर बुरांडे, विलास निंबोरकर, देवानंद कामडी, गजाननराव भांडेकर, ज्ञानेश्वर रायमल, आदी मान्यवर उपस्थित होते.
    
    अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना बबनराव फंड म्हणाले, ओबीसींचे आरक्षण काढुन समाजातील शिक्षित व होतकरू विद्यार्थ्यांवर फार मोठा अन्याय केला आहे. असे प्रतिपादन फॅंड यांनी केले. जि. प. अध्यक्षा भांडेकर, गडचिरोली न. प. च्या नगराध्यक्षा योगिताताई पिपरे यांनीही समाज बांधवांना मागर्दर्शन करून आपण सर्वांनी लढा देवू, असे आवाहन केले. 
    
    संचालन प्रा. राम वासेकर यांनी केले. प्रस्ताविक प्रा. रमेश बारसागडे यांनी तर आभार जितू कुनघाडकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी एकनाथ किरमे, विनायक कुनघाडकर, सुदाम रिकमे, जितू कुनघाडकर, मरोती बारसागडे, सुनिल कुनघाडकर, सुरेश बारसागडे, व संत जगनाडे महाीराज तेली समाज संघटना तळोधी मो. येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला तेली समाजाचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    
    विशेष म्हणजे, समाजप्रबोधन मेळाव्यात जगलेल्या तेली बांधवानी जे साजविरोधी व समाजविघातक स्वत:ला तेली म्हणवून पुढे जाण्याचा प्रयत्न करीत असतील, त्यांनी आपली जात बदलवून दुसर्‍यांचे गुलाम म्हणून जगावे. यापुढे अशा लबाडांना स्थान देवू नका. असा सूर उपस्थित तेली समाज बांधवांमधून उमटू लागला. 

दिनांक 10-12-2017 20:45:12
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in